Friday, 23 March 2018

गोरेगाव पश्चिम -

कुत्रा चावल्यास देण्यात येणारी औषधे सिध्दार्थ रुग्णालयात नाहीत, असा बोर्ड तेथे लावण्यात आला आहे.

परंतू ही औषधे केव्हा येतील ? रुग्णाने कोणत्या सरकारी रुग्णालयात जावे,
याची माहितीसुध्दा लिहिणे आवश्यक होते.

गोरेगाव पश्चिम -

प्रेम नगर येथे क्रांती वेल्फेअर सोसायटी, गणेश वेल्फेअर सोसायटी, मीनाताई ठाकरे नगर येथील गटारांची सफाई नियमित होत नाही. औषध फवारणी केली जात नाही.

ही गटारे 6 फूट रुंद व खोल आहेत. लहान मुलांना अपघात होऊ शकतो.
पाण्याचे अनेक पाईप गटारावरुन गेले आहेत. सर्वांना एकत्रित करुन मोठी पाईप लाईन टाकली पाहिजे.

दिवे खांब अंधूक व काही दिवे बंद आहेत. अंधार असतो.

Friday, 16 March 2018

पी दक्षिण पालिका कार्यालयात


पत्र देण्यात आले.

पालिकेतर्फे सुरु असलेली आरोग्य केंद्रे कोणत्या पत्त्यावर सुरु आहेत ? तेथे कोणत्या आजारावरील औषधे मिळतात ? याची माहिती सामान्य जनतेला नाही.

यासंबंधी पालिका कार्यालयात, सिध्दार्थ रुग्णालयात फलक लावण्यात यावा.
ज्या ठिकाणी आरोग्य केंद्र आहे, तेथे फलक लावण्यात यावा.

Thursday, 15 March 2018

गोरेगाव (प) -

तीन डोंगरी, मासे मार्केट रोड ते प्रेम नगर रोड येथे सायंकाळ नंतर मोठ्या प्रमाणावर वाहनांची गर्दी होते.

लोकांना ये जा करण्यास त्रास होतो. पथदिवे अंधूक प्रकाशाचे आहेत. अंधार असतो.

लोकप्रतिनिधींनी उपाययोजना करणे आवश्यक आहे.

पर्यावरण रक्षक, सामाजिक कार्यकर्ते यांच्या

प्रयत्नांमुळे नद्या स्वच्छ होणार आहेत. दहिसर, पोयसर, वालभाट, ओशिवरा नद्यांचा परिसर सुशोभित होणार आहे. नौकाविहाराची व्यवस्था करण्यात येईल. ...