Wednesday, 7 February 2018

गोरेगाव पश्चिम

सिध्दार्थ हॉस्पिटलच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी प्रतिमा पाटील यांची भेट घेऊन हॉस्पिटलमधील प्रश्न मांडले.

त्यांच्या बोलण्यातून जाणवत होते की, काहीच समस्या नाहीत. रुग्णांना सर्व सुविधा व्यवस्थित मिळत आहेत.

त्यांचे म्हणणे आहे,
- डेंग्यू, टायफाईड टेस्ट होतात.
- ब्लड ग्रूप टेस्ट होतात.
- एक्स रे मशीन चांगल्या आहेत. कधीच बंद पडत नाहीत.
- रुग्णांना औषधे बाहेरुन आणण्यास सांगितले नाही.

रुग्णांच्या तक्रारी असल्यास थेट त्यांच्याशी संपर्क करावा, असे त्यांनी सांगितले.

त्यांना विचारले की,
प्रशासनास आपल्या काही सूचना असल्यास आम्ही कळवू.
तेव्हा त्या म्हणाल्या की, आम्ही आमच्या लेवलवर करु.

म्हणजे या रुग्णालयात काही सुविधा मागणी करायची असेल तर मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांनाच भेटा. पत्रव्यवहार करण्यात वेळ घालवू नका.
www.aaplegoregaon.blogspot.com

No comments:

Post a Comment

पर्यावरण रक्षक, सामाजिक कार्यकर्ते यांच्या

प्रयत्नांमुळे नद्या स्वच्छ होणार आहेत. दहिसर, पोयसर, वालभाट, ओशिवरा नद्यांचा परिसर सुशोभित होणार आहे. नौकाविहाराची व्यवस्था करण्यात येईल. ...