Wednesday, 7 February 2018

गोरेगाव पश्चिम -

नगरसेवक हर्ष पटेल यांना भेटून स्थानिक प्रश्नांवर चर्चा केली.

1) स्टेशनवरील स्कायवॉकवर दिवे बंद असतात, सुरक्षा रक्षक नाहीत.
- यासंबंधी पालिकेशी बोलणे केले आहे. कंत्राट देऊन मार्चपर्यंत सुधारणा करण्यात येईल.

2) आरे रोडवरील भुयारी मार्गात सुरक्षा रक्षक व इतर सुधारणा
- 6 महिन्यात येथे सुधारणा केली जाईल.

3) फेरीवाले प्रश्न
स्टेशनवरील फेरीवाले यांना सुरुवातीला समजवून सांगण्यात आले की, थोडे मागे बसा. येजा करणाऱ्या जनतेला उध्दट बोलू नका.
पण ते ऐकत नव्हते म्हणून स्टेशनवरील फेरीवाल्यांना हटवले.

4) एस व्ही रोडवर कोठेही शौचालय नाही.
- टोपीवाला मंडईसमोर शौचालय बांधत आहोत. भूमीपूजन केले आहे.

5) फिल्मीस्तानच्या मागच्या रस्त्यावरील दिवे अंधूक आहेत. रात्री काहीच दिसत नाही. गुन्हेगारी वाढली आहे.
(त्यांनी हा विषय लिहून घेतला)

6) पोलिस गस्त व्यवस्थित होत नाही. दर्जा घसरला आहे.
- आमचे नेते जयप्रकाश ठाकूर, आमदार विद्या ठाकूर यांना हा मुद्दा सांगणार आहे. संपूर्ण गोरेगावमधील पोलिस गस्त पध्दत सुधारली पाहिजे.

7) सर्टीफिकेट प्रश्नामुळे आपले नगरसेवक पद अडचणीत येईल का ?
- मी कोणताही फ्रॉड केलेला नाही.
www.aaplegoregaon.blogspot.com

No comments:

Post a Comment

पर्यावरण रक्षक, सामाजिक कार्यकर्ते यांच्या

प्रयत्नांमुळे नद्या स्वच्छ होणार आहेत. दहिसर, पोयसर, वालभाट, ओशिवरा नद्यांचा परिसर सुशोभित होणार आहे. नौकाविहाराची व्यवस्था करण्यात येईल. ...