Thursday, 8 February 2018

नगरसेविका राजूल देसाई


यांच्या कार्यालयात तीन डोंगरी, प्रेम नगर रोड येथील प्रश्नांचे निवेदन दिले होते. त्यावेळी समीर देसाई यांच्याशी खालील विषयावर चर्चा करण्यात आली.

प्रेम नगर रोडवर अंधूक दिवे -
वीज अधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे. थोडा अधिक उजेड असलेले दिवे लावण्यात येतील.

रहदारी त्रास वाढला आहे -
आजुबाजूच्या इमारतींनी पत्र दिल्यास त्यावर कार्यवाही करण्यात येईल.

या रोडवरील दोन्ही बगीचे मार्चपर्यंत सुशोभित करण्यात येतील.

प्रेम नगर कॉर्नरला सीसीटीव्ही लावण्यात येईल. जुने एसीपी कार्यालय चौक येथे सीसीटीव्ही लावण्याचा प्रयत्न सुरु आहे.

प्रेम नगर येथे पोलिस बीट चौकी बनविण्यात येईल.

यावेळेस शिवशक्ती मित्र मंडळाचे पदाधिकारी व गोरेगाव भाजपा सचिव निलेश सोमजी, सचीन शर्मा उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

पर्यावरण रक्षक, सामाजिक कार्यकर्ते यांच्या

प्रयत्नांमुळे नद्या स्वच्छ होणार आहेत. दहिसर, पोयसर, वालभाट, ओशिवरा नद्यांचा परिसर सुशोभित होणार आहे. नौकाविहाराची व्यवस्था करण्यात येईल. ...